Homeताज्या बातम्याखराब बसमुळे प्रवाशांना मानसिक त्रास;  पैसे परत मिळावेत म्हणून कोपरगाव डेपो...

खराब बसमुळे प्रवाशांना मानसिक त्रास;  पैसे परत मिळावेत म्हणून कोपरगाव डेपो व्यवस्थापकांची भेट…!

कोपरगाव दि.२९ ( दिपक साटोटे)

कोपरगाव बसस्थानकातून नाशिककडे निघालेल्या एस.टी. बसमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. या प्रकारानंतर काही प्रवाशांनी थेट कोपरगाव बस डेपो व्यवस्थापक अमोल बनकर यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.

(दि.१९ ) मे रोजी नाशिककडे निघालेली बस खोपडी परिसरात अचानक बंद पडली. गाडीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याने चालक व कंडक्टर यांनी गाडी थांबवली. त्यानंतर प्रवाशांना नाशिककडे जाणाऱ्या इतर बसमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्या सर्वच बस भरलेल्या असल्यामुळे अनेक प्रवाशी तासभर अडकून पडले.

या बसमधून न्यायालयीन कामे, सरकारी दप्तरी व्यवहार, रुग्णालय व लग्न समारंभासाठी निघालेल्या प्रवाशांचा विशेष त्रास झाला. काही प्रवाशांनी तिकीटाचे पैसे परत मागितले, मात्र चालक व कंडक्टर यांनी “डेपो कार्यालयात संपर्क करा” असे सांगितले.

त्यानंतर प्रवाशांनी थेट डेपो व्यवस्थापक अमोल बनकर यांची भेट घेतली. त्यांनी संपूर्ण प्रकार समजून घेतला आणि चालकाकडूनही माहिती घेतली. परंतु, बस अचानक बिघडल्यामुळे पैसे परत दिले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांनी यावर प्रश्न उपस्थित केला की, “प्रवासादरम्यान जर एखाद्याजवळ पैसे कमी असतील, तर तिकीट दिलं जात नाही. मग अशा प्रकारे बस बिघडली तर प्रवाशांचे नुकसान का भरून दिले जात नाही?” एका प्रवाशाने तर सांगितले की, “माझं हॉस्पिटलमध्ये अपॉईंटमेंट होतं, उशीर झाल्याने दंडही भरावा लागला.”

या तक्रारींच्या उत्तरादाखल व्यवस्थापक अमोल बनकर यांनी सांगितले की, “कोपरगाव डेपोकडे सध्या ७५ बस आहेत, त्यातील अनेक बस दुरुस्तीसाठी आहेत. डेपोकडे अद्याप १५ नवीन बस’ची आवश्यकता आहे. जुन्या बसमुळेच अशा अडचणी उद्भवतात. मात्र भविष्यात प्रवाशांना त्रास होणार नाही, यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेऊ.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!