Homeताज्या बातम्यापैठण–पाचोड रोडवर स्पीड ब्रेकरची मागणी....

पैठण–पाचोड रोडवर स्पीड ब्रेकरची मागणी….

ग्रामस्थांचा जीव धोक्यात; किशोर तांगडे यांचे निवेदन…

पैठण, दि.२ : ( अभिजीत सोनवणे )

पैठण–पाचोड मुख्य रस्त्यावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळकरी मुले, महिला, जेष्ठ नागरिक यांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांनी या परिस्थितीची दखल घेऊन जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन सादर केले. पैठण–पाचोड रोडवरील खालील ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

आखादवाडा – करंजखेडा फाटा,रहाटगाव – सोलनापूर फाटा,नानेगाव फाटा,दावरवाडी – नांदर फाटा, दादेगांव – हर्षी फाटा या गावांच्या वस्तीभागातून वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने अपघाताची भीती कायम असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

बहुजन शक्ती न्यूज’शी बोलतांना तांगडे यांनी सांगितले, की “ग्रामस्थांच्या सुरक्षिततेशी तडजोड मान्य नाही. मागणी वारंवार करूनही प्रशासन दिरंगाई करत आहे. एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? स्पीड ब्रेकर तातडीने बसवले नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा ही तांगडे यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!