Homeताज्या बातम्याराज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार – मुख्यमंत्री फडणवीस

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार – मुख्यमंत्री फडणवीस

पुणे, दि. ८ ( प्रतिनिधी )

राज्यभरात प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम केल्यास विशेषोपचार केंद्रांवरील ताण कमी होतो. त्यामुळे राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे सशक्त जाळे निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मावळ तालुक्यातील आंबी-तरंगवाडी येथे नव्याने सुरू झालेल्या पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात राज्य शासन महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत गरीब रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. विमा आणि सेवा खात्री यामुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे. तसेच, द्वितीयस्तरीय सेवाही बळकट केल्या जात आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा निर्णय असून, मागील काही वर्षांत १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात आली आहेत. मुलींना वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क परतावा दिला जाणार आहे, ज्यामुळे शिक्षणाचा विस्तार आणि गुणवत्ता वाढणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या योगदानाचे कौतुक करताना म्हटले की, खासगी उच्च शिक्षण संस्थांची उभारणी करून त्यांनी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांच्या कुटुंबीयांनी सात खासगी विद्यापीठे सुरू केली आहेत. गुणवत्तेला धक्का न लावता उत्तम शिक्षण देण्यासाठी त्यांच्या संस्था झटत आहेत.

पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालय हे ६०० खाटांचे अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असून येथे अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. परिसरातील सामान्य नागरिकांना कमी खर्चात चांगले उपचार मिळावेत यासाठी हे रुग्णालय उभारले गेले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ७० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आतापर्यंत १२ ते १५ हजार रुग्णांवर उपचार झाले आहेत.

प्रास्ताविकात कुलपती डॉ. विजय पाटील यांनी रुग्णालयातील सुविधा आणि सेवांची माहिती दिली. रुग्णालयात आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवण्यात येणार असून, परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!