Homeताज्या बातम्या“आले किती, गेले किती – संपले सगळे भरारा; शिवसेनेचा (उबाठा) राहील कायम...

“आले किती, गेले किती – संपले सगळे भरारा; शिवसेनेचा (उबाठा) राहील कायम दरारा!”

उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी बाळा खेडेकर यांची नियुक्ती;

शिवसेना भवनात आशीर्वाद बैठकीत जोशपूर्ण घोषणा

मुंबई, दि १५ ( प्रतिनिधी )

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी बाळा खेडेकर यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, त्या निमित्ताने मुंबईतील शिवसेना भवनात एक आशीर्वाद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ शिवसैनिक, कट्टर कार्यकर्ते आणि स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत बाळा खेडेकर यांनी आपल्या शैलीत जोशपूर्ण भाषण करत कोकणातील शिवसेनेच्या मजबुतीबाबत आश्वस्तता दिली. “आले किती, गेले किती, संपले सगळे भरारा; पण शिवसेनेचाच राहील कायम दरारा,” अशा शब्दांत त्यांनी गद्दारांवर हल्लाबोल करत शिवसैनिकांत नवचेतना निर्माण केली.

खेडेकर म्हणाले, “मी हे पद केवळ स्वतःसाठी स्वीकारलेले नाही, तर हे संपूर्ण शिवसैनिकांचं पद आहे. ‘गाव तिथे शाखा, घर तिथे गटप्रमुख’ ही योजना आम्ही प्रत्यक्षात राबवणार आहोत. कोकणात भगव्या झेंड्याची तोफ पुन्हा वाजवणार आहोत. शिवसेना ही बाप आहे आणि शिवसैनिक त्याचे खरे वारसदार.”

ज्येष्ठ शिवसैनिकांनी देखील खेडेकर यांना मोलाचे मार्गदर्शन देत, “शिवसेना म्हणजे निष्ठा, निर्भीडता आणि निस्वार्थ भाव” असे नमूद केले. त्यांनी आपल्या अनुभवांतून बाळा खेडेकर यांना भरभरून आशीर्वाद दिले.

बैठकीच्या अखेरीस उपस्थित शिवसैनिकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन बाळा खेडेकर यांचे स्वागत केले. उपस्थितांच्या उत्साहाने बैठक तेजस्वी झाली. कोकणातील शिवसेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात या बैठकीने झाली असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे.

शिवसेनेच्या नव्या नेतृत्त्वाखाली कोकणात पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी बाळा खेडेकर सज्ज झाले असून, “शिवसैनिकांची पाठराखण हीच माझी खरी ताकद,” असे ठामपणे सांगत त्यांनी संघटनात्मक मजबुतीवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!