Homeताज्या बातम्याएसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ५३ टक्के;  अपघाती विमा आणि मोफत पासचा...

एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ५३ टक्के;  अपघाती विमा आणि मोफत पासचा दिलासा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) –

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जून २०२५ पासून कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. यापूर्वी हा भत्ता ४६ टक्के होता.

याशिवाय, कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर मोफत एसटी प्रवास पास देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाच्या विविध संघटनांसोबत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदे यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ किंवा ‘धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना’ यामधून एक निवडण्याचा पर्याय दिला जाईल. याशिवाय, अपघाती विमा योजनेंतर्गत, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेतन खातेदार कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत वा सेवेबाहेर दोन्ही स्थितीत अपघात झाल्यास विमा लाभ मिळणार आहे. मृत्यू वा पूर्ण अपंगत्वासाठी एक कोटी रुपये आणि अंशतः अपंगत्वासाठी ८० लाख रुपये विमा रक्कम दिली जाणार आहे.

नवीन निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सुमारे ३५ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा थेट लाभ मिळणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी एसटीची सेवा अधिक सक्षम व स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करत, बस स्थानकांचे रूपांतर ‘बस पोर्ट’मध्ये करण्यावरही भर दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

error: Content is protected !!