Homeताज्या बातम्याक्या हुआ तेरा वादा?" आंदोलनाची पैठणमध्ये सुरुवात

क्या हुआ तेरा वादा?” आंदोलनाची पैठणमध्ये सुरुवात

पैठण, दि. ६ (अभिजीत सोनवणे)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सरकारच्या विस्मरणात गेलेल्या आश्वासनांना उजाळा देण्यासाठी “क्या हुआ तेरा वादा?” या जनआंदोलनाचा प्रारंभ आज पैठण येथून करण्यात आला. तहसील कार्यालयात निवेदन देऊन या आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली.

या वेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलनाच्या निमित्ताने सरकारने केलेल्या अनेक घोषणा व न पुरवलेल्या वचनांची आठवण करून देण्यात आली.

शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महिला सुरक्षेचा अभाव, विद्यार्थ्यांच्या अडचणी यांसह सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या अनेक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत हे आंदोलन राबवण्यात येणार आहे.

यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन पुढील काही दिवसांत राज्यभर सुरू राहणार असून विविध ठिकाणी निवेदने सादर केली जातील, अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

युवासेना, महिला आघाडी, शेतकरी आघाडी यांचा या आंदोलनात सक्रीय सहभाग असून, युवानेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार संजय राऊत यांचे मार्गदर्शन आंदोलनाला लाभत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!