Homeताज्या बातम्याचार मेट्रो मार्गिकेसाठी एकच डेपो... मोघरपाडा येथे भव्य...

चार मेट्रो मार्गिकेसाठी एकच डेपो… मोघरपाडा येथे भव्य मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरण…

ठाणे, दि.१५ ( प्रतिनिधी )

मुंबईच्या मेट्रो यंत्रणेला मजबूती देणाऱ्या आणखी एका ऐतिहासिक टप्प्याची नोंद झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) मोघरपाडा येथे १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळाची जमीन अधिकृतरित्या हस्तांतरित करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ साठी एकात्मिक व जागतिक दर्जाचा मेट्रो डेपो येथे उभारला जाणार असून, याचे संचालन व देखभाल कार्य याच केंद्रातून होणार आहे.

या भव्य प्रकल्पाचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या मार्गदर्शनाखाली, तसेच महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या प्रशासनिक दृष्टीने पार पडले. हा डेपो मेट्रो मार्गिकांमध्ये सुसूत्रता निर्माण करणार असून, एकूण ५५.९९ किमी लांबीच्या मेट्रो सेवेसाठी तो केंद्रबिंदू ठरेल.

मेट्रो गाड्यांसाठी येथे १० वर्कशॉप ट्रॅक, १० निरीक्षण ट्रॅक आणि ६४ स्टेबलिंग ट्रॅकची व्यवस्था असेल. गाड्यांची देखभाल, दुरुस्ती, तपासणी, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्व अत्याधुनिक यंत्रणा येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच डेपो कंट्रोल सेंटर, ऑपरेशन कंट्रोल सेंटर आणि प्रशिक्षण केंद्रांद्वारे संचालनाची कार्यक्षमता वाढवली जाणार आहे.

प्रकल्पासाठी ९०५ कोटींचा ठेका मे. एसईडब्ल्यू–व्हीएसई जॉइंट व्हेंचरला देण्यात आला असून, १३ जून रोजी ‘नोटिस टू प्रोसिड’ जारी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच बांधकामाच्या प्रत्यक्ष टप्प्यास सुरुवात होईल.

या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने सिडकोच्या नमुन्यानुसार समतोल विकास धोरण अवलंबले असून, मूळ जमिनीच्या २२.५% भूखंड पट्टेधारक शेतकऱ्यांना तर १२.५% भूखंड अतिक्रमणधारकांना दिले जातील. भूखंडांचे नियोजन नियोजित ३६ महिन्यांच्या आत पूर्ण केले जाणार आहे.

या डेपोमुळे मुंबई महानगराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार असून, दिवसाला सुमारे १२ लाख प्रवाशांचा भार घेण्याची क्षमता या मेट्रो मार्गिकांमध्ये निर्माण होणार आहे. प्रवासाचा वेळ ५०% नी कमी होईल, तर वाहतूक कोंडी व प्रदूषणातही घट अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हा डेपो हे मुंबईच्या मेट्रो नेटवर्कसाठी एक ऐतिहासिक पाऊल असून, भविष्यातील वाहतूक गरजांसाठी हा निर्णायक ठरेल.”

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हे केवळ पायाभूत नव्हे, तर सर्वसमावेशक प्रगतीचं प्रतिक आहे. शेतकऱ्यांचे पुनर्वसन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि पारदर्शक प्रक्रिया हे आमचे ध्येय आहे.”

महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले, “हा डेपो म्हणजे स्थानिक सहभागातून साधलेला प्रगतीचा आदर्श. यामुळे केवळ मेट्रो मार्गिका नव्हे तर संपूर्ण शहरी जीवनमान सुलभ होईल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!