पैठण, दि. २९ (अंबादास एडके )
दावरवाडी येथील ग्रुप ग्रामपंचायतच्या मैदानावर ग्रामीण रुग्णालय पाचोड व आय.सी.टी.सी.च्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही/एड्स जनजागृती व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिराचा शुभारंभ सरपंच ॲड. डि. डि. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच प्रशांत देशमुख, माजी सरपंच शाम तांगडे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब एडके, गोपाल धारे, इम्रान शेख, प्रविण खांडे, राजू नन्नवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात उपस्थित ग्रामस्थांना एचआयव्ही/एड्स या गंभीर आजाराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. रोगाचा प्रसार कसा होतो, प्रतिबंधक उपाय कोणते आहेत, तसेच वेळेवर निदान व उपचाराचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी अनेक ग्रामस्थांनी मोफत एचआयव्ही रक्त तपासणी करून घेतली.
या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी समुपदेशक श्री. गडकरी, श्री. कापरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ छाया कापडे, संतोष कुलकर्णी यांनी विशेष मेहनत घेतली. ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले.




















