Homeताज्या बातम्यापुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या आदर्शावर वंचितांच्या कल्याणासाठी शासन काम..करणार – मुख्यमंत्री फडणवीस

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या आदर्शावर वंचितांच्या कल्याणासाठी शासन काम..करणार – मुख्यमंत्री फडणवीस

अहिल्यानगर (चौंडी), दि.३१ (प्रतिनिधी )

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडी येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रजाहितदक्ष राज्यकारभाराचा आदर्श घेऊन राज्य शासनही वंचित, गरीब, आणि महिलांच्या कल्याणासाठी झटणार असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, “अहिल्यादेवींनी २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी मंदिरांचे पुनरुज्जीवन, सामाजिक सुधारणा, महिलांचे सक्षमीकरण, व प्रजाहितासाठी न्यायव्यवस्था उभारली. इतक्या संपत्तीवरही त्यांनी कधी स्वतःसाठी खर्च न करता लोककल्याणासाठी खर्च केला. म्हणूनच त्या ‘लोकमाता’ ठरल्या.”

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मस्थान मराठी संस्कृतीचे जागृत स्थान असून, त्यांच्या दूरदृष्टीतून महिलांसाठी सैनिक तुकडी निर्माण केली गेली. आजही शासन त्यांच्या प्रजाहिताच्या धोरणावर काम करत आहे. याच ठिकाणी जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला होता.

६८१ कोटींचा चौंडी विकास आराखडा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, त्रिशताब्दी वर्षानिमित्त शासनाने चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी ६८१ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये भव्य स्मारक, महिलांसाठी ‘आदिशक्ती’ अभियान आणि अहिल्यादेवींवर आधारित बहुभाषिक चित्रपट निर्मितीचा समावेश आहे.

या सोहळ्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागास कल्याण मंत्री अतुल सावे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, मोनिकाताई राजळे, तसेच अनेक मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात लोकराज्यचा विशेषांक आणि अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. जिल्ह्यातील एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रकल्पही राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

error: Content is protected !!