Homeताज्या बातम्याबौद्ध विहाराची जागा हस्तांतरणासाठी त्रिरत्न बुद्ध विहार कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; 

बौद्ध विहाराची जागा हस्तांतरणासाठी त्रिरत्न बुद्ध विहार कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; 

प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी)

वांद्रे (पूर्व) येथील त्रिरत्न बुद्ध विहार कृती समितीने विहाराच्या जागेच्या हस्तांतरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. समितीच्या वतीने निमंत्रक दामोदर गायकवाड, किसन रोकडे, आनंद कांबळे व रमेश धिवारे यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांची भेट न होऊ शकल्याने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.

या निवेदनाद्वारे वांद्रे (पूर्व) येथील त्रिरत्न बुद्ध विहारच्या जागेच्या हस्तांतरणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.शिष्टमंडळाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांचीही भेट घेतली. त्यांनी या संदर्भात बौद्ध समाजातील भावना, रोष व धार्मिक अस्मितेचे महत्त्व अधोरेखित केले.

कृती समितीने स्पष्टपणे सांगितले की, बुद्ध विहाराचे पुनर्वसन हे बौद्ध समाजाच्या श्रद्धा व भावनांशी निगडित असून, शासनाने याची गंभीर दखल घ्यावी. विहाराची जागा शासकीय वसाहतीत हस्तांतरित करून नव्याने बांधकाम करून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर सकारात्मक भूमिका घेतली असून, दोन्ही वरिष्ठ अधिकारी लवकरच शासन स्तरावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समितीचे निमंत्रक किसन रोकडे यांनी सांगितले.

कृती समितीने सर्व बौद्ध बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. समाज सजग व जागरूक राहावा, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, मागणी मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!