Homeताज्या बातम्यानवीन वेळापत्रकानुसार ई-बसेसचा पुरवठा करावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्दे

नवीन वेळापत्रकानुसार ई-बसेसचा पुरवठा करावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्दे

मुंबई, दि.३० ( प्रतिनिधी )

प्रवाशांना दर्जेदार व आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून इवे ट्रान्स प्रा. लि. या कंपनीकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी ५१५० ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार, कंपनीने सुधारित वेळापत्रकानुसार उर्वरित बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत, सरनाईक बोलत होते. या वेळी अपर मुख्य सचिव संजय सेठी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि कंपनीचे प्रतिनिधी के. व्ही. प्रदीप उपस्थित होते.

परिवहन मंत्री, सरनाईक यांनी सांगितले की, “कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षित आहे. तसेच, चालनीय तोट्याच्या पार्श्वभूमीवर व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठा (Viability Gap Funding) मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.”

आत्तापर्यंत कंपनीने २२० ई-बसेसचा पुरवठा केला असून उर्वरित बस सुधारित करारानुसार देण्यात याव्यात, असेही ते म्हणाले.

माध्यमांशी बोलताना, सरनाईक यांनी सांगितले की, “५१५० बसेसपैकी १२ मीटर आणि ९ मीटर लांबीच्या २२० बसेस मिळाल्या आहेत. महामंडळाने यासाठी स्वतंत्र उत्पन्न खाते तयार केले असून, यामधून कंपनीला ६० कोटी रुपये दिले आहेत. आणखी ४० कोटी रुपये लवकरच दिले जाणार आहेत.”

तसेच, महामंडळाला बस संचालनामध्ये होणारा तोटा देखील लक्षात घेऊन, पुढील काही वर्षांत सुमारे ३१९१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार असल्याचे श्री. सरनाईक यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!