पैठण, दि.३१ ( अभिजीत सोनवणे )
मौजे, नांदर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमास सरपंच विजय गायकवाड, उपसरपंच आसमान दादा काळे, माजी उपसरपंच रेवणनाथ कर्डिले,ग्रामपंचायत सदस्य कचरू नाचन, प्रवीण काळे, शिवाजी मगरे, राधाकिसन तळपे, ईश्वर कांबळे, विठ्ठल तळपे, दिगंबर सोनवणे, संजय सदावर्ते, दादासाहेब सोनवणे, बप्पासाहेब सोनवणे, अजय मगरे, माऊली तळपे, योगेश रोडगे, श्रीराम काळे, प्रसाद औटे, संतोष नाचन, निलेश ठाणगे, सुनिल सोनवणे, समाधान काळे, ऋषीकेश जऱ्हाड, कृष्णा जऱ्हाड, अक्षय राऊत, बप्पा ठाणगे, अजय पाचे यांसह गावातील सर्व समाजाचे युवक, प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, राजमाता अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत भविष्यातही असे कार्यक्रम व्हावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




















