Homeताज्या बातम्याम्हाडा वृक्षारोपणासाठी सज्ज 'वन महोत्सव' निमित्त राज्यभरात दोन लाख झाडांची लागवड

म्हाडा वृक्षारोपणासाठी सज्ज ‘वन महोत्सव’ निमित्त राज्यभरात दोन लाख झाडांची लागवड

म्हाडा वृक्षारोपणासाठी सज्ज

‘वन महोत्सव’ निमित्त राज्यभरात दोन लाख झाडांची लागवड

मुंबई, दि.३ ( प्रतिनिधी )

जुलै महिन्यात साजऱ्या होणाऱ्या ‘वन महोत्सव सप्ताहा’च्या निमित्ताने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) राज्यभरात दोन लाख वृक्षांचे रोपण करणार आहे. यामध्ये एकट्या मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ५० हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. ही माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.

म्हाडा मुख्यालयात आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत बोलताना जयस्वाल यांनी सांगितले की, १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत राज्यातील सर्व मंडळांमार्फत वृक्षारोपणाची व्यापक मोहीम राबवण्यात येईल. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, मुंबईतील अविकासयोग्य भूखंडांवर मियावाकी पद्धतीने शहरी जंगले उभारण्यात यावीत. ही पद्धत मर्यादित जागेत जैवविविधता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

मुंबई व कोंकण गृहनिर्माण मंडळांतील वसाहतींमध्येही वृक्षारोपणासाठी संभाव्यता अभ्यासण्याचे निर्देश देण्यात आले असून, मुंबई मंडळाने ५० हजार तर कोंकण मंडळाने २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रोपणासाठी पर्यावरणपूरक वृक्षांचीच निवड करण्यात येणार असून, त्यांच्या दीर्घकालीन देखभालीची जबाबदारी स्थानिक गृहनिर्माण संस्थांवर सोपवण्यात येणार आहे.

वृक्षारोपणासाठी लावली जाणारी सर्व झाडे जिओ टॅग केली जाणार असून, भविष्यात म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये झाडांची तोड टाळण्यासाठी पुनर्लागवड बंधनकारक करण्याचेही नियोजन आहे. प्रारंभी ही अट मुंबईसाठी लागू राहणार असून नंतर ती इतर विभागीय मंडळांमध्येही अमलात आणली जाईल.

या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत जयस्वाल म्हणाले की, वाढते प्रदूषण व जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या विभागीय मंडळांनी प्रत्येकी २५ हजार झाडांचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

error: Content is protected !!