Homeताज्या बातम्याएस टी ' महामंडळाच्या जागांचा ‘ भागीदारी ' पद्धतीने विकास करा –...

एस टी ‘ महामंडळाच्या जागांचा ‘ भागीदारी ‘ पद्धतीने विकास करा – प्रताप सरनाईक

मुंबई, दि.६ ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यात असलेल्या विविध शहरांतील बसस्थानक व आगार परिसरातील जागांचा पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (PPP) पद्धतीने विकास करून महामंडळासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करावेत, अशा सूचन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिल्या.

एस.टी. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस महामंडळाचे महाव्यवस्थापक (स्थापत्य) दिनेश महाजन, वास्तुविशारद लहीवाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या मालकीच्या जागांचा विकास करताना स्थानिक गरजा, बाजारातील संभाव्यता व व्यावसायिक दृष्टिकोन लक्षात घेणे आवश्यक आहे. या जागांचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ असे वर्गीकरण करून त्यांचे पॅकेज तयार करावे, ज्यामध्ये शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील जागांचा समावेश असावा.

राज्यात एकूण ७२ पॅकेजेस तयार करण्यात येणार असून, त्यात बसस्थानके, आगारे व इतर मालमत्तांचा समावेश राहील. प्रत्येक पॅकेजमध्ये मालमत्तेचे मूल्य स्पष्ट करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास सुधारणा करून कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या विकास प्रकल्पाला गती देत तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत मंत्री सरनाईक यांनी महामंडळाला उत्पन्नवाढीच्या दिशेने पावले उचलण्याचे स्पष्ट संकेत दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!