Homeताज्या बातम्यापैठणच्या पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधा तयार कराव्यात – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

पैठणच्या पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधा तयार कराव्यात – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि.११ ( प्रतिनिधी )

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पैठण शहराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात याव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. पैठणच्या विकास आराखड्याविषयी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संदीपान भुमरे, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार विलास भुमरे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेंद्र बोरकर उपस्थित होते.

मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, पैठण हे संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत चांगदेव महाराज यांसारख्या संतांचे निवासस्थान असल्याने त्याला खास अध्यात्मिक ओळख आहे. याशिवाय प्रसिद्ध पैठणी साडीमुळे हे शहर सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.

या विकास आराखड्यात घाटांचा विकास, भक्त निवास, स्थानिक संस्कृती व हस्तकलेचा प्रचार, संत एकनाथ मंदिर परिसरातील रोषणाई, जांभुळवन, दक्षिण काशी मैदान, आपेगावचा समावेश करण्यात यावा, असे त्यांनी सूचित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!