Homeताज्या बातम्याबोरिवली-मागाठाणे ते ठाणे (टिकुजिनीवाडी) दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्प ...

बोरिवली-मागाठाणे ते ठाणे (टिकुजिनीवाडी) दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्प …

५७२ बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनसाठी एमएमआरडीएकडून तीन पर्यायांची घोषणा…

ठाणे, दि.१५ ( प्रतिनिधी )

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महत्त्वाकांक्षी बोरिवली-मागाठाणे ते ठाणे (टिकुजिनीवाडी) या दरम्यानच्या दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पासाठी भूमिगत कामे वेगाने सुरू असून, प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसन प्रक्रियेला आता गती देण्यात आली आहे.

मागाठाणे परिसरातील रूपवते नगर, मिलिंद नगर, फरलेवाडी, एसआरए प्रकल्प आणि रस्त्यालगत फूटपाथवर वास्तव्यास असलेल्या अंदाजे ५७२ झोपड्यांचे पुनर्वसन आवश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने तीन पर्यायांची पुनर्वसन योजना जाहीर केली असून, प्रकल्पग्रस्तांनी आपली पसंती लेखी स्वरूपात सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

१, आर्थिक मोबदल एमएमआरडीएच्या धोरणानुसार, बाधित झोपड्यांच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात नगदी मोबदला देण्यात येणार आहे. हा मोबदला थेट संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

२,स्थायी निवास प्रकल्पग्रस्तांना बोरीवली इंटिग्रेटेड वसाहत तसेच मीरा-भाईंदर येथील रेंटल हाऊसिंग प्रकल्पामधील सदनिका प्रदान केल्या जातील. या सदनिका मे. गुजरात व सोनम इंटरप्राईजेस यांनी बांधल्या असून, नागरिकांच्या मागणीनुसार कायमस्वरूपी स्वरूपात देण्यात येणार आहेत.

३,एसआरए प्रकल्पामार्फत पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून मे. भारद्वाज विकसक यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या पुनर्वसन प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मूळ स्थळीच नवीन सदनिका दिल्या जातील. या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात सदनिकांची अथवा भाड्याची सोय करण्यात येईल.

एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, वरील तीन पर्यायांपैकी निवड करून तत्काळ लेखी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतरच कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेस गती मिळेलअर्ज सादर करताना अथवा अधिक माहितीकरिता उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे (022-26597494) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.हा प्रकल्प मुंबईच्या उत्तर आणि मध्य उपनगरांना ठाणेशी जलद व सुगम कनेक्टिव्हिटी प्रदान करणार असून, वाहतूककोंडी, प्रदूषण आणि प्रवासाचा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!