कोपरगाव,दि.२१ : दिलीप गायकवाड
कोपरगाव नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ६ मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे तरुण, तडफदार आणि अधिकृत उमेदवार संदीप रामदास डुंबरे यांनी धनुष्यबाण चिन्हावरून उमेदवारी दाखल केली आहे.
आज बहुजन शक्ती न्यूजच्या प्रतिनिधींनी त्यांच्या भेटीत निवडणुकीबाबत विचारणा केली असता डुंबरे म्हणाले, “माजी मुख्यमंत्री व सध्या उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे साहेब आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मा. राजेंद्र झावरे यांच्या आशीर्वादामुळे मला ही संधी मिळाली आहे. माझ्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी झावरे साहेबांचा जुना आणि खंदा कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीत मी प्रामाणिकपणे काम केले आहे. विभागातील नागरिकांनी २ तारखेला मतदान करून मला विजयी केले तर या प्रभागाच्या विकासाचे ‘सोनं’ करू. विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.”
प्रभाग क्र. ६ मध्ये या निवडणुकीत चुरस वाढली असून मतदारांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि युवा नेतृत्व या तिन्ही मुद्द्यांवर संदीप डुंबरे यांची मोहीम वेगाने पुढे जात आहे.




















