मुंबई, दि २ : मंगेश म्हात्रे
म्हाडा नाशिक मंडळाच्या ४०२ सदनिकांच्या आगाऊ अंशदान सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी आज वांद्रे येथे प्रारंभ केला.
जेनाशिकमधील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव व ok सातपूर येथील प्रकल्पांतील या सदनिकांची किंमत रुउलोकीमीl. १४.९४ लाख ते ३६.७५ लाखांपर्यंत आहे. अल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठी २९३ आणि १०९ सदनिका उपलब्ध आहेत.
अर्ज: https://housing.mhada.gov.in
वर २३ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत भरता येणार असून अनामत रकमेचा भरणा २४ डिसेंबरपर्यंत मान्य आहे. प्रारूप व अंतिम यादांच्या तारखा म्हाडा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.सर्व अटी–शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले.




















