त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी आज मोर्चा
मुंबई , दि २७ ( प्रतिनिधी )
वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमध्ये उच्च न्यायालयाच्या उभारणीसाठी बांधकामे हटविण्यात येत आहेत. या ठिकाणी त्रिरत्न बुध्द विहार असून या विहाराच्या बचावासाठी स्थानिक रहिवाशी आक्रमक झाले आहेत.
बुध्द विहारासाठी शासकीय वसाहतीमध्येच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी त्रिरत्न बुध्द विहार बचाव कृती समितीच्या वतीने आज २८ फेब्रुवारी रोजी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.यावेळी जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. मागण्या पुढील प्रमाणे :
१) बुध्द विहार आणि गौतम समता सेवा संघ रहिवासी यांचे स्थलांतर शासकीय वसाहत वांद्रे पूर्व, विभागातच करावे.
२) महार्षि वाल्मिकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजना सन्मान ठेवावा.
३) मा. खासदार सुनिल दत्त साहेब आणि मा. आमदार जर्नादन चांदूरकर साहेब यांच्या माध्यमातून सन २००२ साली पुर्नवासीत केलेल्या रहिवाश्यांचे स्थलांतर वांद्रे येथे सा. बा. वि. पि. डब्ल्यू.डी. यांच्या जागेत साडेतीन चौक येथे करावे.
४) बुध्द विहार आणि रहिवाशी सदनिका शासनेने बांधून द्यावे.
5) शासन निर्णय क्रमांक- याचिका-2023 Q.S. a 220/Z.P.N.-2 तारीख. 12/11/2023, मंजुरीची तारीख. 19 ऑगस्ट 2024 रोजी.
६) वांद्रे पूर्व येथेच पी. ए. पी. अंतर्गत सदनिका द्यावेत.
या मोर्च्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहान त्रिरत्न बुध्द विहार बचाव कृती समितीचे निमंत्रक दामोदर गायकवाड, किसन रोकडे, आनंद कांबळे यांनी केले आहे.




















