Homeताज्या बातम्याम्हाडा अतिधोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना २०,००० रुपये भाडे देणार

म्हाडा अतिधोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना २०,००० रुपये भाडे देणार

मुंबई, दि.३ ( प्रतिनिधी )

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ९६ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी म्हाडाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या इमारतीतील रहिवाशांनी स्वतःहून पर्यायी वास्तव्याची व्यवस्था केल्यास त्यांना दरमहा २०,००० भाडे ‘म्हाडा’मार्फत दिले जाणार आहे. हा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी जाहीर केला.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात ९६ इमारती अतिधोकादायक ठरवण्यात आल्या असून, यामध्ये सुमारे २४०० रहिवासी वास्तव्य करत आहेत. मंडळाकडे सध्या फक्त ७८६ संक्रमण गाळे उपलब्ध

असल्यामुळे उर्वरित रहिवाशांना तात्काळ स्थलांतरित करणे शक्य नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी स्वतंत्रपणे केलेल्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी दरमहा आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याचबरोबर, मंडळाला १८० ते २५० चौ. फूट आकाराचे ४०० गाळे तीन वर्षांसाठी भाड्याने घेण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देशही 8 जयस्वाल यांनी दिले आहेत. हे गाळे अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना तात्पुरत्या निवासासाठी वापरले जाणार आहेत.सदर निर्णयांतर्गत जेव्हा सदर इमारतींच्या जागेवर विकासकांकडून पुनर्विकास होईल, तेव्हा मंडळाने केलेल्या भाडेभरणा किंवा गाळे भाड्याने घेण्याचा संपूर्ण खर्च विकासक किंवा संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेने भरणे बंधनकारक राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई शहरात सध्या १३,०९१ उपकरप्राप्त इमारती अस्तित्वात आहेत आणि मंडळाकडे २०,५९१ संक्रमण गाळ्यांची उपलब्धता आहे. ही व्यवस्था धोकादायक किंवा दुरुस्तीच्या गरजेतील इमारतीतील रहिवाशांसाठी केली जाते.

म्हाडाचा हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरणार असून, अतिधोकादायक इमारतींमधून रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

error: Content is protected !!