Homeताज्या बातम्यासमृद्धी महामार्गाचे इगतपुरी ते आमणे (भिवंडी) मार्गाचे लोकार्पण; पर्यावरण संवर्धनासाठी १० कोटी...

समृद्धी महामार्गाचे इगतपुरी ते आमणे (भिवंडी) मार्गाचे लोकार्पण; पर्यावरण संवर्धनासाठी १० कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट

समृद्धी महामार्गाचे इगतपुरी ते आमणे (भिवंडी) मार्गाचे लोकार्पण; पर्यावरण संवर्धनासाठी १० कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती; वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई, दि.५ ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकार्पणानंतर मान्यवरांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः वाहन चालवत महामार्गाची पाहणी केली.

या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच वेगमर्यादेचे भान ठेवावे, असे आवाहन केले. “समृद्धी

महामार्ग हा राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु त्याचा सुरक्षित आणि शिस्तबद्ध वापर नागरिकांनी करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. “यंदा राज्यात १० कोटी रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांनंतर राज्यातील इतर प्रकल्पांनाही गती दिली जाईल,” असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे आणि कामगारांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे (इगतपुरी ते आमणे, भिवंडी) आज थाटात लोकार्पण करण्यात आले. यानंतर संपूर्ण ७०१ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग नागपूरपासून थेट मुंबईपर्यंत पूर्णपणे सुरु झाला आहे.

या अंतिम टप्प्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासात मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार असून, विशेषतः नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना याचा विशेष लाभ होणार आहे. महामार्गामुळे वाहतूक सुरळीत होणार असून उद्योग, पर्यटन आणि शेती क्षेत्राला देखील चालना मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!