कामाठीपुरा पुनर्विकासासाठी म्हाडातर्फे निविदा जाहीर
८००१ भाडेकरू व ८०० जमीन मालकांचे होणार पुनर्वसन;
मुंबई, दि. १२ ( प्रतिनिधी )
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक व प्राचीन कामाठीपुरा भागाच्या एकत्रित समूह पुनर्विकासासाठी म्हाडाच्या आर आर मंडळातर्फे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बांधकाम व विकास संस्था नियुक्त करण्यासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे.
कामठीपुरा गल्ली क्र. १ ते १५ या भागातील उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा विकास डीसीआर २०३४ च्या ३३(९) नियमानुसार करण्यात येणार आहे.
या भागात सुमारे ८ हजार १ रहिवासी व ८०० जमीन मालक आहेत. या प्रकल्पातून रहिवाशांना सुरक्षित, नियोजनबद्ध व मोठ्या सदनिकांचे पुनर्वसन मिळणार असून, वाणिज्यिक इमारती व सार्वजनिक सुविधा देखील निर्माण होणार आहेत. या प्रकल्पात म्हाडाला ४४ हजार चौ.मीटर क्षेत्र , तर विकासकाला सुमारे ५ लाख ६७ हजार चौ. मीटर क्षेत्र उपलब्ध होणार असून, ४ हजार ५०० नवीन सदनिका तयार होणार आहेत.
मेसर्स माहिमतुरा कन्सल्टंट्स यांना या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आले असून ‘कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प – अर्बन व्हिलेज’ या नावाने आराखडा सादर केला गेला आहे.
कामाठीपुरा भागातील ३४ एकर क्षेत्रावर सुमारे ९४३ इमारती असून त्यातील बहुतांश इमारती
१०० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. त्यामुळे या भागासाठी समूह पुनर्विकास हा एकमेव शाश्वत पर्याय ठरत आहे.
जमीन मालकांसाठीही विशेष मोबदल्याची तरतूद असून, भूखंडाच्या क्षेत्रानुसार ५०० चौ. फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येणार आहेत




















