Homeताज्या बातम्याकुणी घर देता का घर? बिल्डरांना 'संक्रमण शिबिरा'साठी म्हाडाचे आवाहन!

कुणी घर देता का घर? बिल्डरांना ‘संक्रमण शिबिरा’साठी म्हाडाचे आवाहन!

मुंबई, दि. १३ ( मंगेश म्हात्रे )

“कुणी घर देता का घर?” – नटसम्राट सिनेमातील या भावस्पर्शी संवादाप्रमाणेच, आज ही साद खुद्द म्हाडाकडून आली आहे. म्हाडाच्या आरआर मंडळाने धोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांसाठी तात्पुरत्या निवासाच्या (संक्रमण शिबिर) व्यवस्था करण्यासाठी मुंबईतील बिल्डरांना आपली घरे भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.

या निर्णयामुळे अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित, सुसज्ज आणि तात्पुरते निवासस्थान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उपमुख्य अधिकारी उमेश वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक विकासकांनी खालील अटी आणि शर्तींनुसार आपले प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन त्यांनी केले आहे.

यानुसार सदनिका अधिकृत आणि कायदेशीर दस्तावेजासह असाव्यात.प्रत्येक सदनिका किमान २२५ ते २७५ चौरस फुटांची असावी.स्वतंत्र बाथरूम आणि शौचालयाची सुविधा आवश्यक.कार्यक्षम वीज आणि जलपुरवठा असावा.चार मजल्यांहून अधिक इमारतीसाठी लिफ्ट अनिवार्य.पार्किंगची सोय आवश्यक आणि कोणतेही थकीत देयक नसावे.भाडेकरार किमान दोन वर्षांचा असेल. दरवाढ व कालावधी वाढीचा निर्णय म्हाडा घेईल.कोणतीही पूर्वसूचना देऊन म्हाडा करार रद्द करू शकते.प्रस्तावात या अटी व शर्ती आहेत.

इच्छुक बिल्डरांनी आपले प्रस्ताव उपमुख्य अधिकारी (संक्रमण गाळे),म्हाडा यांच्याकडे सादर करावेत,असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!