Homeताज्या बातम्याप्रभाग ८ मध्ये अपक्ष उमेदवार अर्जुन मोरे यांना चांगला प्रतिसाद...

प्रभाग ८ मध्ये अपक्ष उमेदवार अर्जुन मोरे यांना चांगला प्रतिसाद…

कोपरगाव, दि.२१ : दिलीप गायकवाड

कोपरगाव नगरपरिषद संस्थानिक स्वराज्य निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ (सुभाषनगर) येथून सामाजिक कार्यकर्ता अर्जुन रघुनाथ मोरे यांनी यंदा अपक्ष उमेदवार म्हणून स्वबळावर उमेदवारी दाखल केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मोरे यांची भेट घेतली असता त्यांनी विभागात केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

मोरे यांनी सांगितले की, “विभागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून माझ्या उमेदवारीबाबत लोक आनंद व्यक्त करत आहेत. सामाजिक कामामुळे नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे.”

मोरे यांनी मागील काही वर्षांत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक उपक्रमांमध्ये; २०१६ मध्ये तीव्र उन्हाळ्यात टँकरद्वारे मोफत पाणीवाटप,रमजान महिन्यात मोफत ब्लॅंकेट वाटप,दिवाळीत गरजूंना मोफत फराळ वाटप,

कोरोना काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून सॅनिटायझर फवारणी,विनामूल्य मास्क वाटप,

साई कॉर्नर, बस स्टँड, दत्त पाडा, खंदक नाला व हनुमान मंदिर परिसरात अन्नदान, गीता प्रेसात्म शाळेला पाच खुर्च्यांची भेट, विद्यार्थ्यांना पेन्सिल, पेन, पुस्तके वाटप,२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्या नागरिकांसाठी ‘शाई दाखवा, नाश्ता करा’ हा उपक्रम,

अशा विविध कामांचा समावेश आहे.

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमा, मदतकार्य अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये मोरे यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. “नागरिकांनी माझ्या सामाजिक कामाला मान्यता देत मतदानाचा विश्वास दिल्यास विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करणार आहे,” असे मोरे यांनी भेटीदरम्यान सांगितले.यावेळी अनिल जाधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!