Homeताज्या बातम्यावार्ड क्र. १८१ : महायुतीत उमेदवारीसाठी चुरस; वडाळ्यातील राजकारण तापले

वार्ड क्र. १८१ : महायुतीत उमेदवारीसाठी चुरस; वडाळ्यातील राजकारण तापले

मुंबई, दि. २६ : मंगेश म्हात्रे

वडाळा परिसरातील वार्ड क्रमांक १८१ मध्ये आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महालढतीची रंगत वाढली असून महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रभाग खुला असल्याने पुरुष पदाधिकारी अधिक उत्साहाने पुढे येत आहेत.

शिवसेना शिंदे गटातून माजी नगरसेविका पुष्पा कोळी, शाखाप्रमुख संजय रणदिवे भाजपमधून आशिष साळसकर रिपब्लिकन सेनेचे मनोज गायकवाड यांची नावे उमेदवारीसाठी समोर येत असून महायुतीच्या अंतर्गत कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग १८१ मध्ये कोरबा मिठागर, आनंदवाडी, बरकत अली नगर, आजाद मोहल्ला आणि शांतीनगर हे प्रमुख भाग येतात. सुमारे ५५ हजार मतदार असलेल्या या प्रभागात दलित – ४०%, ओबीसी – १३%, मुस्लिम – १५%, ख्रिश्चन – २%, तर खुला प्रवर्ग – ३०% असा मतदारांचा समतोल आहे. त्यामुळे विविध सामाजिक गटांना साधणारा उमेदवार देण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे.

या प्रभागात सायन कोळीवाडा विधानसभेतील २२ बूथ, तर वडाळा विधानसभेतील ११ बूथ येतात. एफ-नॉर्थ विभागातील हा दोन्ही विधानसभा क्षेत्रांना जोडणारा एकमेव प्रभाग असल्याने राजकीय वजन तितकेच जास्त मानले जाते.

महापालिका निवडणूक २०१७ मध्ये या प्रभागातून काँग्रेसच्या पुष्पा कोळी यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या माधुरी ढोके आणि मनसेच्या स्नेहा हीवाळकर यांना त्यांनी पराभूत केले होते. विशेष म्हणजे, त्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये कोळी यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.

आगामी निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असल्याने प्रभाग १८१ मध्ये उमेदवार ठरवताना मोठा तिढा निर्माण झाला आहे. सामाजिक व राजकीय समीकरणे जुळवताना नेतृत्व कोणाला तिकीट देणार, यावर प्रभागातील निवडणूक समीकरणे पालटू शकतात.

वडाळ्यातील राजकारण सध्या उमेदवारीच्या चर्चांनी तापले असून, हा प्रभाग महायुतीतील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!