पंचवार्षिक सुरक्षा तपासणी फक्त ₹150 मध्ये
कोपरगाव, दि. १९ : दिलीप गायकवाड
सणासुदीच्या काळात HP GAS ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. घरगुती गॅसची पंचवार्षिक सुरक्षा तपासणी आता केवळ 150 रुपये मध्ये करण्यात येणार आहे. याआधी ही तपासणी 236रू.मध्ये होत होती.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निर्देशानुसार प्रत्येक घरगुती गॅस कनेक्शनची पाच वर्षांतून एकदा अधिकृत HPCL मेकॅनिककडून सुरक्षा तपासणी करणे अनिवार्य आहे. या तपासणीमुळे गॅस लिकेज, पाईपची स्थिती, रेग्युलेटर तपासणी इत्यादी बाबींविषयी खात्री केली जाते, ज्यामुळे आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित होते.
तसेच, बायोमेट्रिक EKYC न झालेल्या ग्राहकांनी त्वरित कोपरगाव गॅस कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून मोफत EKYC पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गॅस सुरक्षेच्या दृष्टीने दर पाच वर्षांनी गॅस सुरक्षा पाईप बदलणे देखील बंधनकारक आहे. पाईपवर नमूद असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग व एक्सपायरी डेट तपासणे गरजेचे असल्याचे कंपनीने सांगितले.
HPCL व केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूचनेनुसार, सुरक्षा तपासणी व EKYC न झालेल्या गॅस कनेक्शनला असुरक्षित घोषित करून त्यांचा गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो, तसेच सरकारी गॅस सुविधा थांबू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
कोपरगाव गॅस कंपनी
02423-222525, 9325992525, 9511778777, 9960784048
सुरक्षित दिवाळी साजरी करा — आपल्या गॅस सुरक्षेची खात्री करून!




















