गेवराई,दि.१६ : अनंता मोटे
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी आज गेवराई तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतीतील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि शासनाकडून शक्य ती मदत तातडीने मिळेल असे आश्वासन दिले.
अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची ठरली. त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.
या दौऱ्यावेळी गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित, स्थानिक पदाधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.




















