१३१ पैकी तब्बल ६६ जागा महिलांसाठी राखीव
ठाणे, दि.११ : अजय मगरे
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या आरक्षण सोडतीत महिलांचा प्रचंड दबदबा दिसून आला आहे. एकूण १३१ नगरसेवक जागांपैकी तब्बल ६६ जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि सर्वसाधारण अशा सर्व प्रवर्गांमध्ये महिलांना भरघोस प्रतिनिधित्व मिळाले आहे.
प्रभागनिहाय व्यवस्था :
या निवडणुकीत ठाणे शहरातील ३३ प्रभागांमधून १३१ सदस्य निवडले जाणार आहेत. त्यापैकी ३२ प्रभाग चार सदस्यीय, तर प्रभाग क्रमांक २९ हा तीन सदस्यीय आहे. या प्रभागरचनेतून शहराच्या सर्व भागांना समान प्रतिनिधित्व मिळेल, असे प्रशासनाने सांगितले.
प्रवर्गनिहाय आरक्षण:
प्रवर्ग एकूण जागा महिलांसाठी आरक्षित पुरुष/सर्वसाधारण
अनुसूचित जाती (एससी) ९
अनुसूचित जमाती (एसटी) ३
मागासवर्ग (ओबीसी/एनटी/विजेएनटी ) ३५
सर्वसाधारण (खुला) ८४
एकूण १३१
महिलांना ५० टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व मिळाल्याने या निवडणुकीत महिला उमेदवारांची ताकद लक्षणीय वाढणार आहे.
सोडत प्रक्रियेतील प्रमुख टप्पे :
एससी महिला आरक्षण :
९ प्रभाग एससी साठी निश्चित असून, त्यापैकी ५ प्रभाग एससी महिलांसाठी आरक्षित ठरले (प्रभाग क्र. ३, ६, ७, ९, १५, १६, २२, २४, २८).
एसटी महिला आरक्षण साठी ३ प्रभाग (१, २, ५) असून, त्यापैकी २ प्रभाग महिलांसाठी राखीव झाले.
ओबीसी साठी एकूण ३५ जागा असून त्यापैकी १८ महिला, तर १७ सर्वसाधारण अशा प्रमाणात विभागणी करण्यात आली. काही प्रभागांत इतर मागासवर्गीय आरक्षणासाठी सोडत घेण्यात आली.
महिला आरक्षण : (खुला)
महिलांचे प्रमाण पूर्ण करण्यासाठी ४१ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.




















