Homeताज्या बातम्याड्रोनच्या साह्याने उंच फळझाडांची फवारणी सोपी

ड्रोनच्या साह्याने उंच फळझाडांची फवारणी सोपी

कोपरगाव,दि.१५. ( दिलीप गायकवाड )

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र गिरमे यांनी आपल्या ३ एकर आंबा बागेत ड्रोनच्या साह्याने औषध फवारणी करून आधुनिक शेतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. उंच व मोठ्या फळझाडांवर पारंपरिक पद्धतीने फवारणी करणे कठीण जात असताना ड्रोन तंत्रज्ञानामुळे हे काम अल्पावधीत आणि अचूकरीत्या पूर्ण झाले.

नैसर्गिक दूषित हवामान, कीड व रोगराईमुळे आंबा झाडांच्या पानांवर, मोहरावर किंवा फळांवर रोग आल्यास फवारणी करणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे ठरते. मात्र आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानामुळे कमी वेळेत, कमी खर्चात आणि योग्य प्रमाणात औषध फवारणी शक्य झाली आहे. यामुळे मजुरी खर्चात बचत होऊन पिकांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होत असल्याचे गिरमे यांनी सांगितले.

या प्रात्यक्षिकावेळी संजय तुकाराम होले (मामा), कोपरगाव उपस्थित होते. त्यांनी ड्रोन फवारणीची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती संकलित केली. ही माहिती बहुजन शक्ती न्यूज चॅनेल ला देण्यात आली.

ड्रोनच्या माध्यमातून शेतीत नवतंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, ही पद्धत इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यास शेती अधिक कार्यक्षम व फायदेशीर होऊ शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहादच्या विचारसरणीवर कृत्य...

मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

मिशन भरारी’ला शिंदेंचा हिरवा झेंडा; ठाणे ग्रामीण विद्यार्थ्यांची अवकाशाकडे झेप

ठाणे : अजय मगरे ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा...

शिवसेनेतर्फे जय भवानी नगरमध्ये मराठी भाषा वर्गांची सुरुवात; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी उपक्रम ठरणार महत्त्वाचा

ठाणे : अजय मगरे   स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी शिवसेना तर्फे जय भवानी नगर येथे मराठी भाषा वर्गांचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे....

माटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय‘ पुस्तकाचे प्रकाशन   मुंबई : अजय मगरे   आंबेडकरवादी स्त्रियांच्या काव्यपरंपरेचा वेध घेणाऱ्या ‘'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय ’ या काव्यसंग्रहाच्या...

error: Content is protected !!