पैठण, दि. १४ : (अभिजीत सोनवणे)
पैठण तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी गटवार आरक्षणाची घोषणा होताच तालुक्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. या घोषणेनंतर अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी सक्रिय हालचाली सुरू केल्या असून, राजकीय समीकरणात उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घोषित आरक्षणानुसार काही गट अनुसूचित जाती काही इतर मागासवर्गीय तर अनेक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांना प्रतिनिधित्वाची मोठी संधी मिळाल्याने अनेक नवोदित चेहऱ्यांना राजकारणात प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील काही इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. त्यात —
अनिल बोधणे, ऊदयसेन काळे, प्रविण काळे (पंचायत समिती) तसेच अर्चना चंद्रशेखर सरोदे, जयश्री राजेंद्र वाघमोडे आणि वर्षा रेवणनाथ कर्डीले (जिल्हा परिषद), किशोर पाटील तांगडे (जिल्हा परिषद) अशी नावे आघाडीवर आहेत.
दरम्यान, तालुक्यातील पंचायत समिती गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे —चितेगाव – अनुसूचित जाती (महिला),रांजणगाव खुरी – सर्वसाधारण,बिडकीन – सर्वसाधारण,निलजगाव – ओबीसी (महिला),आडूळ – सर्वसाधारण (महिला),बालानगर – सर्वसाधारण (महिला),पाचोड – सर्वसाधारण (महिला),एकतुनी – सर्वसाधारण,दावरवाडी – ओबीसी (महिला),नांदर – सर्वसाधारण,ढोरकिन – सर्वसाधारण (महिला),लोहगाव – सर्वसाधारण (महिला),पिंपळवाडी – ओबीसी (सर्वसाधारण),मुधलवाडी – अनुसूचित जाती (पुरुष),
विहामांडवा – सर्वसाधारण,केकत जळगाव – सर्वसाधारण,नवगाव – ओबीसी (सर्वसाधारण),चांगतपुरी – सर्वसाधारण (महिला)..
या आरक्षणामुळे तालुक्यातील विविध राजकीय गटांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. पक्षनिष्ठा, जातीय आरक्षण आणि महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नव्या उमेदवारांच्या संधी वाढल्या असून, आगामी काही दिवसांत तालुक्यातील राजकारण आणखी रंगतदार होणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.




















