Homeताज्या बातम्यासायन प्रतिक्षानगरमध्ये म्हाडाचा वादग्रस्त फ्लेक्स; रहिवाशांचा तीव्र विरोध

सायन प्रतिक्षानगरमध्ये म्हाडाचा वादग्रस्त फ्लेक्स; रहिवाशांचा तीव्र विरोध

मुंबई, दि.२४ : मंगेश म्हात्रे

सायन प्रतिक्षानगर म्हाडा संक्रमण शिबिरातील टी-३६, टी-३७, टी-५३ आणि टी-५४ या इमारती धोकादायक असून ‘गाळे तात्काळ रिकामी’ करण्याचा फ्लेक्सद्वारे जाहीर केल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या फ्लेक्समध्ये आयआयटी पवईचा द्वारे या इमारतींचा स्ट्रचरल ऑडिटचा करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला असून या इमारती राहण्यासाठी धोकादायक असल्याचे फ्लेक्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

अचानक आणि कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारचे फ्लेक्स लावून म्हाडाने रहिवाश्यांवर “बिल्डिंग रिकामी करा” असा दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

रहिवाशांच्या मते, इमारती धोकादायक असल्याचे सांगत म्हाडाने फ्लेक्सवरून तात्काळ गाळे रिकामे करण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात स्थलांतराची कोणतीही पारदर्शक प्रक्रिया, योग्य बैठक, लेखी हमी किंवा संवाद साधला गेलेला नाही. त्यातच फ्लेक्सवर दिलेले पर्याय ; संक्रमण शिबिरातील गाळे किंवा २० हजार रुपये प्रतिमहिना भाडे , हे अपुरे, अव्यवहार्य आणि रहिवाशांच्या संख्येच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली.

म्हाडाने प्रथम सर्वसमावेशक बैठक घेऊन, पुनर्विकासाचा आराखडा स्पष्ट करून, तात्पुरत्या निवासाची हमी व वेळापत्रक द्यायला हवे होते. लावण्यात आलेला फ्लेक्स “अन्यायकारक व असंवेदनशील” असल्याची प्रतिक्रिया भाजप मंडळ अध्यक्ष दत्ता केळूसकर यांनी दिली आहे.

“आमच्या सुरक्षेची काळजी आहे की पुनर्विकासाचा बहाणा करून आम्हाला बेघर करण्याचा डाव?

म्हाडाने फ्लेक्स लावून जबरदस्तीचा संदेश दिला आहे. चर्चा न करता उघड्यावर अशा नोटीससारखा बोर्ड लावणे म्हणजे धमकावणेच,” अशी प्रतिक्रिया प्रतिक्षानगर संक्रमण शिबीर पुनर्वसन कृती समिती सचिव लवू नर यांनी दिली आहे.

रहिवाश्यांनी म्हाडाला मागणी केली आहे की, अचानक फ्लेक्स लावून लोकांमध्ये भीती निर्माण करणे थांबवावे.पुनर्विकासाची अधिकृत माहिती, दस्तऐवज, वेळापत्रक व हमीपत्र द्यावे.

प्रत्यक्ष सर्वसामान्यांशी चर्चा करून लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यावा.दरम्यान म्हाडाच्या निर्णयाविरोधात रहिवाश्यांनी एकजुटीने पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!