Homeताज्या बातम्या. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या विकासासाठी स्वतंत्र योजना...

. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या विकासासाठी स्वतंत्र योजना…

पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद – मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई, दि. १४ : अजय मगरे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याला अभिवादन म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संस्थांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या सोसायटीअंतर्गत येणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहांच्या इमारतींच्या जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी पुढील पाच वर्षांत एकूण ५०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून, दरवर्षी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचा प्रसार आणि वंचित समाजघटकांना ज्ञानाचे दालन खुले करण्यासाठी ८ जुलै १९४५ रोजी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी अनेक महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था उभारून सामाजिक क्रांतीचे पायाभूत कार्य केले.

या अंतर्गत मुंबईतील सिध्दार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सिध्दार्थ नाईट हायस्कूल, सिध्दार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, सिध्दार्थ विधी महाविद्यालय, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (वडाळा) यांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल, मिलिंद प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल, तसेच अजिंठा बॉईज होस्टेल आणि प्रज्ञा मुलींचे वसतिगृह या संस्थांचा समावेश आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनाशी निगडित शैक्षणिक स्थळांचा विकास करण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला होता. त्याच निर्णयाच्या पुढील टप्प्यात या संस्थांचा सर्वांगीण विकास, जतन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी आता ही स्वतंत्र योजना राबविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

error: Content is protected !!