Homeताज्या बातम्यारमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकासाला प्रारंभ; 

रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकासाला प्रारंभ; 

दोन वर्षांत सर्व रहिवाशांना मिळणार आपले घर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

मुंबई, दि.१४ : अजय मगरे

“कुणालाही विकास आणि घरापासून वंचित राहू देणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमीपूजन केले. समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी घरे देण्यात येणार असून, पुढील दोन वर्षांत रहिवाशांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार संजय दिना पाटील, आमदार राम कदम, पराग शहा, मिहिर कोटेचा, माजी नगरसेवक परमेश्वर कदम आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “गेल्या ४५ वर्षांपासून विदारक परिस्थितीत राहणाऱ्या रमाबाई आंबेडकर व कामराज नगरमधील नागरिकांना अखेर न्याय मिळाला आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेला हा पुनर्विकासाचा प्रश्न शासनाने शासकीय संस्थांच्या माध्यमातून सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकांच्या गुंतागुंतींपासून दूर राहून एसआरए आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारला जात आहे.”

ते पुढे म्हणाले, “राज्य सरकारने दोन वर्षांचे आगाऊ भाडे देऊन नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय केली आहे. एमएमआरडीए आणि एसआरए यांनी निर्धारित कालावधीत म्हणजेच दोन वर्षांत हे बांधकाम पूर्ण करावे,” असे निर्देशही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “समूह पुनर्विकास ही माझी संकल्पना असून ती आता वास्तवात उतरत आहे. मुंबईसाठी मोठ्या प्रमाणावर समूह पुनर्विकास धोरण मंजूर करण्यात आले आहे. या योजनेद्वारे झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना केवळ घरच नाही, तर खेळाचे मैदान, जिम, शाळा, आरोग्य केंद्र अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नफा कमी झाला तरी चालेल, पण लोकांचा विकास थांबणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पांतर्गत रमाबाई आंबेडकर व कामराज नगर परिसरातील हजारो झोपडपट्टीधारकांना आधुनिक, सुसज्ज आणि सुरक्षित घरे मिळणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षिततेत जगणाऱ्या नागरिकांच्या जीवनात नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

error: Content is protected !!