Homeताज्या बातम्यासंविधानामुळेच आपण वाचू” — डॉ. प्रा. अक्षयराज आंबेडकर

संविधानामुळेच आपण वाचू” — डॉ. प्रा. अक्षयराज आंबेडकर

नांदगाव येथे ‘जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा’ कार्यक्रमात प्रतिपादन…

धम्मचक्र प्रवर्तन दिन व संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम..

कोपरगाव, दि.१५ : दिलीप गायकवाड

नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुका येथील जुन्या तहसिल कार्यालय परिसरात बुधवार रोजी ‘जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनोज चोपडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. प्रा. अक्षयराज आंबेडकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी म्हटले की, “भारतीय संविधानाचे चार स्तंभ आहेत आणि या चार स्तंभावरच आपला देश उभा आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क सुरक्षित केले आहेत. लोकशाही जिवंत ठेवणारे हे संविधानच आपल्याला वाचवणार आहे,” असे ते म्हणाले.

डॉ. आंबेडकर पुढे म्हणाले की, “आमच्या परिवाराची परिस्थिती गरीब होती, तरी बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेकरता अर्पण केले. त्यांनी दिलेले संविधान हे भारतीय समाजावरचे मोठे उपकार आहेत. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनीच दिला आहे,” असे ते म्हणाले.

भारतीय संविधान टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.

कार्यक्रमात नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, भाजपा व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, नगरसेवक भारत वानखेडे, राजेश कवडे, अरुण पाटील, अमित पाटील (एमव्हीपी संस्था), कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, तसेच मुंबई येथील रमेश, संदेश, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज चोपडे यांनी केले, सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित जाधव, दीपक अंभोरे, मोहित भोसले, मोहसीन बेग, भुषण मराठे, पंकज जगताप, सागर अडकमोल आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

: दिलीप गायकवाड:

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

error: Content is protected !!