Homeताज्या बातम्या१९ लाख शेतकऱ्यांना १,३३९ कोटींचा सरकारचा मदतनिधी;

१९ लाख शेतकऱ्यांना १,३३९ कोटींचा सरकारचा मदतनिधी;

छत्रपती संभाजीनगर विभागाला सर्वाधिक ७२१ कोटींची मदत

मुंबई, दि. २३ : ( नितीन एडके )

राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करून त्याचे जीवन सुकर करण्यासाठी ही मदत निश्चितच उपयोगी पडेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

अमरावती विभाग – अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील ७ लाख ८८ हजार ९७४ शेतकऱ्यांच्या ६ लाख ५४ हजार ५९५.४२ हेक्टर वरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी ५६५ कोटी ६० लाख ३० हजाराच्या मदतीस मान्यता.

नागपूर विभाग – नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील ३७ हजार ६३१ शेतकऱ्यांच्या २१ हजार २२४.६४ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी २३ कोटी ८५ लाख २६ हजाराच्या मदतीस मान्यता.

पुणे विभाग – पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या ८ हजार ८३५.१५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १४ कोटी २८ लाख ५२ हजाराच्या मदतीस मान्यता.

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील १० लाख ३५ हजार ६८ शेतकऱ्यांच्या ८ लाख ४८ हजार ४४५.३७ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजाराच्या मदतीस मान्यता.

नाशिक विभाग – नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील २४ हजार ६७७ शेतकऱ्यांच्या १२ हजार १४९.४६ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १३ कोटी ७७ लाख ३१ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांचे जीवन सुरळीत होण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

error: Content is protected !!