Homeताज्या बातम्याकोपरगाव नगरपरिषद निवडणूक : उमेदवारांच्या ‘चरित्रा’वर मतदारांचा भर; अपक्षांकडेही वाढते आकर्षण

कोपरगाव नगरपरिषद निवडणूक : उमेदवारांच्या ‘चरित्रा’वर मतदारांचा भर; अपक्षांकडेही वाढते आकर्षण

कोपरगाव, दि.२० : दिलीप गायकवाड

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नोंदणीकृत पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही प्रचाराला वेग घेतला असून घरदारांपर्यंत पोहोचण्याची चुरस वाढली आहे. यंदाची निवडणूक विशेष ठरणार असून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांची एकत्रित निवडणूक होत असल्याने मतदारांना दोन मतांचा हक्क मिळणार आहे.

नगरपरिषदेची रचना १५ प्रभाग आणि एक नगराध्यक्ष अशी असून नगराध्यक्षपदासाठी संपूर्ण शहरभर फिरून प्रचार करावा लागत आहे. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, यावेळी मतदार पक्ष चिन्हांपेक्षा उमेदवारांच्या ‘चरित्रावर’ जास्त भर देताना दिसत आहेत. उमेदवाराचा पूर्वीचा कारभार, स्वभाव, भ्रष्टाचाराचे आरोप, मालमत्ता तपशील यांसारख्या मुद्द्यांवर मतदार खुलेपणाने चर्चा करत आहेत.

भाजपाकडून पराग संधान हे मागील पराभव विसरून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून काका कोयटे यांनी भाजपाची साथ सोडून आमदार अशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार सुरू केला आहे. कोयटे यांच्या बाबतीत निवरा वसाहतीतील काही मुद्द्यांवर चर्चा रंगत असल्याचे दिसते.

दोन्ही शिवसेना गटांनीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले आहेत. शिवसेना (ए. शिंदे) गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे मैदानात आहेत, तर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाकडून सपना मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय, माजी नगराध्यक्ष विजय वाधाणे हे अपक्ष म्हणून लढत असून, माजी नगराध्यक्ष बबन वाजे यांचे चिरंजीव दीपक वाजे हेही अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.

शहरातील चर्चेनुसार, पक्षीय उमेदवारांइतकीच चर्चा अपक्ष उमेदवारांभोवतीही रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे, दीपक वाजे (अपक्ष) आणि सपना मोरे (शिवसेना – उद्धव ठाकरे) या दोघांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे कोपरगावचे राजकारण अधिकाधिक रंगू लागले असून, अंतिम निकालापर्यंत अनेक नवे समीकरणे निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!