मुंबई, दि.२१ : अजय मगरे
आझाद मैदानात सुरू असलेल्या भारतीय न्यायसंहिता, नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २५ मिनिटांच्या नाट्यप्रात्यक्षिकातून नवीन कायदे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जात आहेत.मुख्य नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा, न्याय वैद्यक विभाग, न्यायालयीन विभाग आणि कारागृह अशी दालने आकर्षण ठरत आहेत. कायद्यावरील डिजिटल प्रश्नावली व माहितीपर पोस्टर्सही उपलब्ध आहेत.
हे प्रदर्शन २३ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत खुले राहणार असून विद्यार्थ्यांनी व विधिज्ञांनी आवर्जून भेट द्यावी, असे गृह विभागाने आवाहन केले आहे.




















