ठाणे , दि २ ( अजय मगरे. )
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना घेण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. अनेक दशकांपासूनची मागणी अखेर मान्य करण्यात आल्याने देशभरातून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. विशेषतः सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ठाणे शहरातील भाजपा नेते भुषण पांडुरंग पाटील म्हणाले, “देशातील सर्व जाती-समाजांना न्याय देण्यासाठी आणि त्यांची खरी परिस्थिती समोर आणण्यासाठी ही जनगणना गरजेची होती. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे.”
दुसरीकडे, अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी करणारे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार मात्र अद्याप या निर्णयावर मौन बाळगत आहेत. यामुळे जनतेतून “आता हे नेते गप्प का?” असा प्रश्न विचारला जात आहे.
भूषण पाटील यांचे म्हणणे आहे की, “विरोधकांनी ही मागणी केवळ राजकीय हेतूने केली होती. आता जेव्हा केंद्र सरकारने ती मान्य केली, तेव्हा त्यांच्यातील श्रेयासाठीची चढाओढ आणि मौन यामधून त्यांची संकुचितता स्पष्ट होते.”
कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांचे आभार मानले आहेत.




















