Homeताज्या बातम्यापारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी जपली वारकरी परंपरा; जिजाऊ संस्थेची आषाढी दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू

पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी जपली वारकरी परंपरा; जिजाऊ संस्थेची आषाढी दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू

ठाणे, दि.२५.( अनिल काकुळते)

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी येऊर अभ्यासिका तसेच ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी आणि ठाणे स्टेशन कम्प्युटर क्लासेससह विविध अभ्यासिकांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत आषाढी दिंडी उत्साहात साजरी केली.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून ठाण्यातील अभ्यासिकांमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक सण उत्साहात साजरे केले जातात. यंदाही येऊर अभ्यासिका, ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी, ठाणे स्टेशन कम्प्युटर क्लासेस, डम्पिंग अभ्यासिका, लोकमान्य नगर अभ्यासिका, घोलाई नगर अभ्यासिका, दिघा अभ्यासिका, दिवा अभ्यासिका, मापानपाडा अभ्यासिका, भोलानगर अभ्यासिका आणि मुंब्रा अभ्यासिका येथून आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम”, “जय हरी विठ्ठल” आणि “पांडुरंग हरी” अशा जयघोषांनी परिसर भक्तिमय केला. दिंडीमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातत्याने विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असून, आषाढी दिंडी हा त्याच परंपरेचा एक प्रेरणादायी भाग ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल....

पुणे : हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील २६ वर्षीय तरुणाला राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या...

तंबाखूच्या पुड्यांवरील धार्मिक प्रतीकांच्या गैरवापराविरोधात कोपरगावात आंदोलन; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

प्रकरण FDA आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे वर्ग; ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा कोपरगाव | प्रतिनिधी तंबाखूच्या पुड्यांवर पंढरपूर, 'ओम' आणि 'गाय' यांसारख्या धार्मिक व...

पुणे FDA ने अस्वच्छतेच्या बाबतीत 12 भोजनालय, रेस्टॉरंट आणि बेकरीचा परवाना निलंबित केला आहे....

रेस्टॉरंटमध्ये अस्वच्छ परिस्थिती पुणे: अन्न आणि औषध प्रशासन (FDA) ने संपूर्ण प्रदेशातील 12 भोजनालये, रेस्टॉरंट्स आणि बेकरींचे परवाने आणि नोंदणी निलंबित केली असून...

हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांची...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे म्हणाले की, सरकारने आंदोलकांशी संवाद साधून संवाद साधावा पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

error: Content is protected !!