Homeताज्या बातम्याशेती वाढवायची असेल तर आधी उद्योग वाढला पाहिजे - राम भोगले

शेती वाढवायची असेल तर आधी उद्योग वाढला पाहिजे – राम भोगले

‘उद्यम विकसित मराठवाडा’ अभियानाचा प्रारंभ; पाच वर्षे दर दोन महिन्यांनी उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : अजय मगरे

“शेती वाढवायची असेल, तर आधी उद्योग वाढला पाहिजे. खते, बियाणे, कीडनाशके आणि प्रक्रिया उद्योग वाढले नसते, तर वाढत्या लोकसंख्येचे ताट भरणे शक्य झाले नसते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून MIT येथे CASMBच्या वतीने आयोजित ‘उद्यम विकसित मराठवाडा’ अभियानाच्या विशेष पर्वात ते बोलत होते.

शासकीय योजनांच्या मोठ्या अर्थसंकल्पीय तरतुदींचा लाभ खऱ्या गरजूपर्यंत पोहोचतो का, याचा विचार करण्याची गरज आहे. “अनुदान लाटायचे आणि उद्योग उभा करायचा नाही,” अशी खंतही भोगले यांनी व्यक्त केली. कमी गुंतवणुकीत कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याची मराठवाड्यात मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

CASMBचे सरचिटणीस डॉ. उमेश कांबळे यांनी मराठवाड्यात उद्योजकता वाढविण्यासाठी दर दोन महिन्यांनी कार्यक्रम आणि सलग पाच वर्षे अभियान राबविण्याची घोषणा केली. “व्यवसाय करण्यासाठी बाहेरून कुणी येणार नाही; तो आपल्यालाच उभा करावा लागेल,” असे त्यांनी सांगितले.

अभियानातील सत्रांमध्ये कृषी, उद्योग, महिला शेतकरी, हवामान बदल, पाणी, कृषी प्रक्रिया आणि तंत्रज्ञानावर चर्चा झाली. ॲडव्हांटा सीड्सचे पांडुरंग पाटील यांनी मराठवाड्यात दोन ते तीन लाख एकरांवर चारा क्लस्टर उभारण्याची संधी असल्याचे सांगितले. ४० ते ९० दिवसांत चारा पीक तयार होत असल्याने शेतकऱ्यांना सातत्याने उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

APEDAचे नागपाल लोहकरे यांनी कृषीमालाच्या मूल्यवर्धनावर भर दिला. मोसंबीपासून हेस्पेरिडीन, डाळिंबाच्या सालीपासून सौंदर्यप्रसाधने, सोयाबीन-तूरडाळीपासून प्लांट प्रोटीन आणि ज्वारीपासून नैसर्गिक स्वीटनर तयार करण्याच्या संधी त्यांनी मांडल्या.

रेशीम प्रक्रिया मराठवाड्यातच हवी

महाराष्ट्र सिल्क असोसिएशनचे राजेश उरकुडे यांनी राज्यातील रेशीम कोष उत्पादनापैकी सुमारे ६० टक्के वाटा मराठवाड्याचा असल्याचे सांगितले. मात्र प्रक्रिया रामनगर आणि बंगळूरला होत असल्याने स्थानिक प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

PMFME योजनेच्या अंमलबजावणीत राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाल्याबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांचा सन्मान करण्यात आला. समारोपावेळी उद्योजक व स्टार्टअप संस्थापकांचा गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसटी बसस्थानकांतील अस्वच्छता खपवून घेणार नाही! प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेस विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री...

मुंबई : अजय मगरे एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. बसस्थानकांवर स्वच्छता राखण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित...

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक उघड; एकास अटक

ऐरोलीत बाराचाकी ट्रक पकडला; ४८ हजार मद्याच्या बाटल्यांसह १.३० कोटींचा मुद्देमाल जप्त ठाणे : अजय मगरे परराज्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या बाराचाकी ट्रकवर राज्य उत्पादन...

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने लोककलेचे दिमाखदार पर्व संपले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक दिमाखदार पर्व संपले आहे,...

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ स्थगितीचा काळ प्रशिक्षणासाठी वापरा; नियमांची...

मुंबई : अजय मगरे महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे....

मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मित्र आणि डॉ महेंद्र कल्याणकर यांना...

ठाणे : प्रतिनिधी प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना यंदाचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठवाडा...

error: Content is protected !!