Homeताज्या बातम्याअमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ स्थगितीचा काळ प्रशिक्षणासाठी...

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ स्थगितीचा काळ प्रशिक्षणासाठी वापरा; नियमांची अंमलबजावणी होणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे

महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. ही स्थगिती म्हणजे नियम रद्द झाल्याचा अर्थ नसून, या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या पुढील टप्प्याच्या नियोजनासाठी सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारासाठी मराठीत संवाद साधता येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांना प्रशिक्षण
परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या **‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद भाषा अभियान’**च्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० हून अधिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली. सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

राज्यात सुमारे ९ लाख ७८ हजार रिक्षा व टॅक्सी चालक कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे ९ लाख १६ हजार ऑटोरिक्षा चालक आणि ६१ हजार टॅक्सी चालकांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेशात ४ लाख ४० हजार २३८ रिक्षाचालक आणि ४३ हजार १०६ टॅक्सीचालक आहेत.

ऑनलाइन प्रशिक्षणाचीही सुविधा
अद्याप मोठ्या संख्येने अमराठी चालक व्यावहारिक मराठी प्रशिक्षणापासून दूर असल्याने अभियानाचा दुसरा टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्रांसोबतच ऑनलाइन माध्यमातूनही व्यावहारिक मराठी शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

“स्थगितीचा कालावधी मराठी शिकण्यापासून दूर राहण्यासाठी नसून स्वतःला तयार करण्याची संधी आहे. प्रत्येक अमराठी चालकाने मराठी संवाद भाषा अभियानात सहभागी होऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी. प्रवाशांशी त्यांच्या भाषेत संवाद साधल्याने प्रवास अधिक सुलभ आणि आपुलकीचा होईल,” असे सरनाईक यांनी सांगितले.

आरटीओंना प्रशिक्षण केंद्रांसाठी समन्वयाचे निर्देश
चालकांना प्रशिक्षणासाठी स्थानिक शाळा अथवा उपलब्ध जागांचा वापर करावा. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मोठ्या संख्येने चालकांना प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधावा, असे निर्देश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

१८ ऑगस्ट २०२७नंतर व्यावहारिक मराठीसंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याने चालकांनी आतापासूनच प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसटी बसस्थानकांतील अस्वच्छता खपवून घेणार नाही! प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेस विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री...

मुंबई : अजय मगरे एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. बसस्थानकांवर स्वच्छता राखण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित...

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक उघड; एकास अटक

ऐरोलीत बाराचाकी ट्रक पकडला; ४८ हजार मद्याच्या बाटल्यांसह १.३० कोटींचा मुद्देमाल जप्त ठाणे : अजय मगरे परराज्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या बाराचाकी ट्रकवर राज्य उत्पादन...

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने लोककलेचे दिमाखदार पर्व संपले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक दिमाखदार पर्व संपले आहे,...

मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मित्र आणि डॉ महेंद्र कल्याणकर यांना...

ठाणे : प्रतिनिधी प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना यंदाचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठवाडा...

शेती वाढवायची असेल तर आधी उद्योग वाढला पाहिजे – राम भोगले

‘उद्यम विकसित मराठवाडा’ अभियानाचा प्रारंभ; पाच वर्षे दर दोन महिन्यांनी उपक्रम छत्रपती संभाजीनगर : अजय मगरे “शेती वाढवायची असेल, तर आधी उद्योग वाढला पाहिजे. खते, बियाणे,...

error: Content is protected !!