Homeताज्या बातम्याशेतीत कष्ट करणाऱ्या महिलांना आता ‘शेतकरी’ म्हणून मान्यता..

शेतीत कष्ट करणाऱ्या महिलांना आता ‘शेतकरी’ म्हणून मान्यता..

प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

मुंबई : अजय मगरे

शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना आता ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

राज्यातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी २२ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम लागू करण्यात आला. या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देण्याबरोबरच त्यांचा स्वतंत्र डेटाबेस तयार करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

*जमिनीच्या मालकीपेक्षा प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा*

महिला शेतकरी म्हणून मान्यता देताना केवळ जमिनीच्या मालकीचा निकष लावला जाणार नाही. महिलेचा शेती आणि शेतीपूरक व्यवसायातील प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. पिकांची लागवड, बीजोत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उत्पादन, फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कृषी-वनीकरण आणि कंपोस्ट निर्मिती आदी कामांचा यात समावेश आहे.

भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी, भूमिहीन पशुपालक, शेतमजूर, रोपमळा मजूर आणि पशुचारक महिलांनाही या व्यापक व्याख्येत समाविष्ट करण्यात आले आहे.

*ग्रामसभेच्या मान्यतेनंतर प्रमाणपत्र*

ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेती व्यवसायात कार्यरत असलेल्या महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो संबंधित नियमित किंवा विशेष ग्रामसभेसमोर ठेवला जाईल. अर्जदार महिला अधिनियमातील किमान एका शेती अथवा शेतीपूरक कार्यात सहभागी असल्याची पडताळणी करून ग्रामसभा मान्यता देईल.

अर्ज नाकारल्यास त्याची कारणे ठरावात लेखी नमूद करावी लागणार आहेत. ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या आत महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नगरपंचायत क्षेत्रात अर्ज सर्वसाधारण सभेसमोर ठेवून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

*महिनाभर जनजागृती अभियान*

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कृषी विभागाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत या कायद्याच्या अंमलबजावणीवर विशेष भर दिला जाणार आहे. पात्र महिलांची ओळख पटविणे, ऑनलाइन अर्जासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे आणि व्यापक जनजागृती करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

*ऑनलाइन अर्जाचे आवाहन*

पात्र महिला शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था; नागरिकांचा संताप

ठाणे, दि.१७.( अजय मगरे ) अंबिका नगर नं. २, शिवराय गल्ली येथील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड-पुणे थेट रेल्वेसेवा सुरू 

१७ सप्टेंबरला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; बीडकरांची दीर्घकाळची मागणी पूर्ण   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबरपासून बीड-पुणे दरम्यान पहिली दैनंदिन थेट...

क्यूआर कोडधारक फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा..

जनवादी हॉकर्स सभेची पालिका आयुक्तांकडे मागणी; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचीही मागणी मुंबई : अजय मगरे मुंबई महापालिकेने २०१४च्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्रे देऊन...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

error: Content is protected !!