Homeताज्या बातम्यापरराज्यातील अवैध मद्याची वाहतूक उघड; एकास अटक

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक उघड; एकास अटक

ऐरोलीत बाराचाकी ट्रक पकडला; ४८ हजार मद्याच्या बाटल्यांसह १.३० कोटींचा मुद्देमाल जप्त

ठाणे : अजय मगरे

परराज्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या बाराचाकी ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ऐरोली येथे धडक कारवाई केली. या कारवाईत गोवा निर्मित ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’च्या ४८ हजार बाटल्या आणि ट्रक असा एकूण १ कोटी ३० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जावेदखान नवाबखान पिंजारी (२४) याला अटक करण्यात आली आहे.

बेलापूर-ठाणे मार्गावरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने ऐरोली रेल्वेस्थानकासमोर सापळा रचला. यावेळी संशयित टाटा ट्रक अडवून तपासणी केली असता, साबणाचे बॉक्स असल्याचे सांगण्यात आलेल्या खोक्यांमध्ये मद्याच्या बाटल्या आढळल्या. एक हजार बॉक्समध्ये १८० मिली क्षमतेच्या ४८ हजार बाटल्या होत्या. या मद्याची महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असून, बाटल्यांवर बॅच क्रमांक आणि कमाल किरकोळ किंमतही नमूद नसल्याचे तपासात आढळले.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसटी बसस्थानकांतील अस्वच्छता खपवून घेणार नाही! प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेस विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री...

मुंबई : अजय मगरे एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. बसस्थानकांवर स्वच्छता राखण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित...

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने लोककलेचे दिमाखदार पर्व संपले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक दिमाखदार पर्व संपले आहे,...

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ स्थगितीचा काळ प्रशिक्षणासाठी वापरा; नियमांची...

मुंबई : अजय मगरे महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे....

मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मित्र आणि डॉ महेंद्र कल्याणकर यांना...

ठाणे : प्रतिनिधी प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना यंदाचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठवाडा...

शेती वाढवायची असेल तर आधी उद्योग वाढला पाहिजे – राम भोगले

‘उद्यम विकसित मराठवाडा’ अभियानाचा प्रारंभ; पाच वर्षे दर दोन महिन्यांनी उपक्रम छत्रपती संभाजीनगर : अजय मगरे “शेती वाढवायची असेल, तर आधी उद्योग वाढला पाहिजे. खते, बियाणे,...

error: Content is protected !!