कोपरगाव, ता. १९ : किशोर शेलार
कोपरगावात गोदामाई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने गोदावरी नदी स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेत नदी परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
नदीतील प्लास्टिक, कचरा तसेच धार्मिक विधींमधून निर्माण होणारा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करून “स्वच्छ नदी – आरोग्यदायी जीवन” हा संदेश दिला.
“गोदावरी आपली जीवनवाहिनी आहे. तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.” पुढील रविवारी पुन्हा एकदा स्वच्छता मोहिम राबविण्याची माहिती गोदाबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी दिली.
तसेच या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचे योगदान असावे असे आवाहन उपाध्यक्ष सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी केले. यावेळी आप्पासाहेब नवले,संदेश शेजवळ, प्रा.जनार्दन सुपेकर, डाॅ.ऋषिकेश सानप, प्रज्ज्वल ढाकणे,प्रारद ढाकणे, श्रीक्षा ढाकणे आदी उपस्थित होते.




















