Homeताज्या बातम्याटाकळी येथे ऊस जळीताची दुर्घटना...

टाकळी येथे ऊस जळीताची दुर्घटना…

 देवकर वस्तीतील युवकांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली

कोपरगाव, दि. २४ : दिलीप गायकवाड

कोपरगांव येथील टाकळी येथे दुपारी २ च्या सुमारास प्रगतशील शेतकरी वासुदेव कारभारी देवकर यांच्या गट नं. १८० मधील ऊसाच्या शेतात लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील हा ऊस असून सुमारे एक एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.

एमएसईबीच्या पोलजवळील तारेला शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शेजारील निखिल देवकर यांनी उसाच्या शेतातून उठणारा मोठा जाळ पाहताच तत्काळ गजानन देवकर यांना कळवून मदत कार्य सुरू केले. काही क्षणांतच संपूर्ण देवकर वस्तीतील युवकांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणासाठी प्रचंड प्रयत्न केले.

त्यांच्या तत्परतेमुळे पश्चिम बाजूस असलेले मका व ऊस क्षेत्र तसेच उत्तरेच्या दिशेने असलेले सात ते आठ एकर ऊस आणि इतर शेतकऱ्यांची शेती वाचविण्यात यश आले. अन्यथा मोठे नुकसान झाले असते.

आग विझविण्याच्या मोहिमेत सभापती सुनीलभाऊ देवकर, मच्छिंद्र देवकर, राजकिरण देवकर, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सतीश देवकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शशिकांत देवकर, उपसरपंच संजयभाऊ देवकर, शाम भोकरे, प्रवीण मालकर, प्रसाद मालकर, अनिल बापूसाहेब देवकर, पांडुरंग देवकर, निखिल देवकर, गजानन देवकर, आप्पासाहेब देवकर, पिंटू देवकर, जगन्नाथ देवकर, साहिल देवकर, ओम देवकर, बापू मालकर, भाऊसाहेब देवकर, परसराम देवकर, गोरख देवकर, सतीश मालकर, राजीव बापू देवकर, बद्रीनाथ शेलार आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

तसेच जवळील पेट्रोल पंपावरून पाण्याची सोय करून आग नियंत्रणात आणण्यात मोठी मदत झाली. भाजपचे बूथप्रमुख अनिल देवकर यांनीही उल्लेखनीय प्रयत्न केले.

दरम्यान, एमएसईबीचे वायरमन निकम साहेब, हुळेकर साहेब तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभागप्रमुख सुशांत आहेर साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सदर ऊस जळीताचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!