Homeताज्या बातम्याप्रनिल काळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान..

प्रनिल काळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान..

पैठण,दि.३१.( अभिजीत सोनवणे )

पैठण तालुक्याचे सुपुत्र डॉ. प्रनिल सुनिल काळे यांनी सॅम हिग्गिनबॉटम कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठ, प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथून कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयात, कृषी अर्थशास्त्र विभागांतर्गत पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

त्यांनी “कॉटन कल्टिव्हेशन, सीड प्रोडक्शन ॲन्ड मार्केटिंग डायनॅमिक्स इन औरंगाबाद ॲन्ड जालना डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट: ॲन इकॉनॉमिक ॲनालिसिस” या विषयावर प्रा. डॉ. आशिष समर्पित नोएल यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल संशोधन केले. या अभ्यासातून मराठवाड्यातील कापूस शेती, बियाणे उत्पादन व विपणन प्रक्रियेचे आर्थिक विश्लेषण करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी धोरणात्मक उपाय सुचविण्यात आले आहेत.

डॉ. काळे यांनी कृषी पदवी शिक्षण छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित कृषी महाविद्यालय, कांचनवाडी (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, चाकुर येथे पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले.

पीएच.डी. शिक्षणादरम्यान त्यांना छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती – 2022 मिळाली असून, त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उत्कृष्ट सादरीकरणासाठी पुरस्कार प्राप्त केले आहेत.

त्यांचे वडील श्री. सुनिल रेणुकादास काळे (एलआयसी, छत्रपती संभाजीनगर), मातोश्री सौ. प्रविणा काळे(गृहिणी), पत्नी सौ. प्रियांका काळे (महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ) व बहिण चैत्राली काळे (आय.डी.बी.आय. बँक, अंबाजोगाई) यांच्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. काळे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्व क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!