Homeताज्या बातम्यादिव्यांग व्यक्तींसाठी व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सुविधा सुरू – तुकाराम मुंढे

दिव्यांग व्यक्तींसाठी व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सुविधा सुरू – तुकाराम मुंढे

मुंबई, दि. ७ : अजय मगरे

दिव्यांग व्यक्तींसाठी योजनांची माहिती मिळवणे आणि तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने अभिनव पाऊल उचलले आहे. विभागाकडून एआय-आधारित व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट 7821922775 हा क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच तक्रार नोंदवणे हे आता “एका क्लिकवर” शक्य झाले आहे, अशी माहिती विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.

मुंढे म्हणाले, “या चॅटबॉटमध्ये ‘भाषिणी’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे टाईप करणे कठीण असलेल्या व्यक्ती आता फक्त व्हॉईस नोटद्वारे — मराठी किंवा इंग्रजी भाषेत — आपली तक्रार सहज नोंदवू शकतात.”

या सेवेच्या माध्यमातून तक्रारींची ‘सेल्फ ट्रॅकिंग’ सुविधा उपलब्ध असून, तक्रारीची सद्यस्थिती थेट व्हॉट्सअ‍ॅपवर पाहता येईल. शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत हा चॅटबॉट विकसित करण्यात आला असून तो अत्याधुनिक एआय मॉडेलवर आधारित आहे.

हे मॉडेल वापरकर्त्याची भाषा, संदर्भ आणि तक्रारीचा विषय ओळखून त्याचे स्वयंचलित वर्गीकरण करते आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवते.

तक्रारीवर संबंधित अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत कारवाई सुरू करणे बंधनकारक आहे. तसेच पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखण्यासाठी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. विभागाकडून दर आठवड्याला सर्व तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे,” असे मुंढे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

error: Content is protected !!