पैठण तालुक्यातील दावरवाडी शिवारात बैंकेच्या कर्मचाराला लुटल्याची घटना..
पैठण,दि.( अभिजीत सोनवणे )
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवावृत्त कर्मचारी गणेश पहीलवान हे अस्थाई कर्मचारी म्हणून नेमणूकीस आहेत.दि १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.४० वाजेच्या सुमारास मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा मार्केट यार्ड नारळा येथील शाखेतुन रोख २५ लाख रूपये गोणी मध्ये त्यांच्या स्कुटीवरून पैठण पाचोड रोडने घेऊन जात असतांना दावरवाडी शिवारात त्यांच्या पाठीमागुन एक काळया रंगाची मोटार सायकल व त्यावर दोन अज्ञात इसम तोंड बांधलेले यांनी त्यांना आवाज देऊन थांबवले ,त्यांची स्कुटी आडवुन फिर्यादीस धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख २५ लाख रुपयांची गोणी जबरदस्तीने हिसकावुन पळुन गेले, याप्रकरणी पोलिस ठाणे पाचोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत् यांनी तात्काळ गुन्हाचे घटना ठिकाणी त्यांचे पथकासह भेट देऊन घटनेची माहीती काढून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, पैठण येथील दैनंदिनी झालेले आर्थिक व्यवहार बाबत बँक अधिकारी व स्टाफ यांच्याकडे बारकाईने माहीती काढली असता त्यात असे दिसुन आले की भारत राजेंद्र रुपेकर रा. नानेगाव ता. पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांचे घरापासून दावरवाडी बैंक शाखा अवघ्या २ कि. मी. अंतरावर असतांना देखील दुरच्या तो पैठण येथील शाखेमध्ये आलेला असुन तो मागील दोन वर्षांपासून बैंकेत व्यवहारीकता आलेला नाही, घटनेच्या दिवशी बैंकेत आलेला होता. यावरून पथकास संशय निर्माण झाला, तसेच सदर इसम हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे दिसून आले. लगेचच स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी दिवसभर परिसर पिंजून काढत तपासाची चक्रे फिरवुन तब्बल २४ तांसामध्ये चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.. या प्रकरणी भारत राजेंद्र रुपेकर वय ३० रा.नानेगाव ता. पैठण, विष्णू कल्याण बोधने वय २४ रा. नानेगाव ता पैठण, सचिन विठ्ठल सोलाट वय २५ रा, राहुल नगर, उत्तर जायकवाडी पैठण, विशाल दामोधर चांदणे वय २४ रा. आखातवाडा ता पैठण. या चारही आरोपींच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असुन त्यांच्याकडुन एकुण ३१ लाख ५६,हजार रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..




















