कोपरगाव दि.२० : दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाची संरक्षण ग्रील २९ सप्टेंबर २०२५ रोजी आलेल्या महापुरात तुटून पडली असून, ती तात्काळ दुरुस्त करावी किंवा नवी ग्रील बसवावी, अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टने केली आहे.
गोदामाई मोहिनीराज नगर, कोपरगाव येथील प्रतिनिधी आजिनाथ ढाकणे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, पुलाची ग्रील निकामी झाल्याने अपघातांची शक्यता प्रचंड वाढली आहे. दररोज १२ ते १५ हजार शाळा- कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह हजारो नागरिक या पुलावरून ये-जा करतात. वाहनेही मोठ्या वेगाने धावत असल्याने होणाऱ्या धक्काबुक्कीमुळे कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गोदामाई प्रतिष्ठानची मागणी : गोदावरी पुलावरील संरक्षण ग्रील तातडीने बसवावे
कोपरगाव : प्रतिनिधी