कोपरगाव, दि.१४.( दिलीप गायकवाड )
“कोपरगावच्या शैक्षणिक परंपरेला संत ज्ञानेश्वर स्कूलमुळे ने जागतिक ओळख मिळवून दिली आहे. नासा सारख्या संस्थेत झळकलेला माजी विद्यार्थी रोहित पवार हा शाळेच्या गुणवत्तेचा पुरावा आहे,” असे प्रतिपादन के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले. शाळेच्या ‘संस्कृति संगम’ वार्षिक स्नेहसंमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सालकर, मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, प्राचार्य सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे म्हणाले, “स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा आविष्कार असून, त्यातून आत्मविश्वास वाढतो.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. वार्षिक अहवाल वैशाली लोखंडे यांनी सादर केला. सूत्रसंचालन वैष्णवी काळे व गीतांजली आहेर यांनी केले.




















